Pramod Yadav
गोवा विधानसभेचे सहा दिवसीय अर्थसंकल्पीय अधिवेशन 02 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत पार पडले.
विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन गावडे-तवडकर वाद, 39A सह विविध कारणांनी चांगलेच गाजले.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभापती तवडकरांनी मंत्री गावडे यांच्या खात्यात विशेष अनुदानाचा गैरवापर केल्याचा आरोप केल्याने चांगलाच वाद निर्माण झाला.
मागील अनेक दिवसांपासून मागणी होत असलेल्या एसटी आरक्षणाबाबत विरोधकांनी चर्चेची मागणी केली, याच काळात एसटी समाजाने विधानसभेवर मोर्चा काढला.
नगरनियोजन खात्याने आणलेल्या 39A सुधारणा विधेयकावरुन सभागृहात गोंधळ झाला, मतदानाची मागणी करणाऱ्या वेंझी यांना यावेळी बाहेर काढण्यात आले.
दुहेरी नागरिकत्वाचा मुद्दा देखील विधानसभेत चांगलाच गाजला, याप्रकरणी गृह आणि परराष्ट्र विभागाशी चर्चा करुन तोडगा काढण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्त मोदींचे अभिनंदनासह या दिवशी धार्मिक सलोखा दिवस साजरा करावा आणि सुट्टी जाहीर करावी असा खासगी प्रस्ताव कृष्णा साळकर यांनी मांडला.
या प्रस्तावावर सभागृहात खुमासदार चर्चा ऐकायला मिळाली, विरोधकांनी सुट्टीच्या प्रस्तावाला विरोध केला. नंतर हा सुट्टीचा प्रस्ताव नाकारला.
अधिवेशनात 08 तारखेला मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वर्ष 2024-25 वर्षासाठीचा 26,855 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला.
याशिवाय विधानसभा अधिवेशनात खाण सुरु करण्याबाबत तसेच, डपिंग आणि पर्यटनाच्या विविध मुद्यांवर चर्चा झाली.