Manish Jadhav
गोव्याला समृद्ध असा वारसा लाभला आहे. पोर्तुगिजांची वसाहत राहिलेल्या गोव्यात इतिहास मनाला भावतो.
गोव्यातील प्राचीन मंदिरे आजही त्यांचं प्राचीनत्व जपून आहेत. गोव्याला आपण मंदिरांचं प्रदेशही म्हणू शकतो.
पोर्तुगिजांनी आपल्या शासनकाळात अनेक चर्च बांधली. आज गोव्यातील हे चर्च पर्यटनस्थळे बनली आहेत.
गोवा म्हटलं येथील प्रसिद्ध समुद्रकिनारे... अशी जणू काही ओळखच बनली आहे. गोव्यात येणारा पर्यटक प्रसिद्ध समुद्रकिनारे पाहतोच पण जे सिक्रेट समुद्रकिनारे आहेत ते ही पाहण्याचा प्रयत्न करतो.
पणजी हे शहर गोव्याची राजधानी तर आहेच, पण याच शहरातून गोव्याच्या मुक्तीसंग्रामाची गाथा लिहिली गेली.
आजचा गोवा अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त आहे. मनाला भावणाऱ्या गोव्यात पर्यटक सुट्टी मिळाली की येणं पसंद करतो.
गोव्याची संस्कृती ही मिश्र संस्कृती आहे. येथील मंदिरे, चर्च, गुरुद्वारा, मस्चिद याची साक्ष देतात. गोव्यातील प्रसिद्ध लोकनृत्य, सण मनाला भावतात.
गोव्यात येणारा पर्यटक इथल्या गोवन फूडच्या प्रेमातच पडतो. विशेषत: विविध प्रकराचे सीफूड्स नक्की ट्राय करतो.
गोव्यातील गडकिल्ले आपल्या प्रदेशाच्या इतिहासाची साक्ष्य देतात. तुम्ही सर्वांनी अग्वाद किल्ला पाहिला असेलच. पण हा किल्ला सोडूनही अनेक प्रसिद्ध किल्ले आहेत.