Goa Heart Lake: समुद्रकिनाऱ्यांचा कंटाळा आला? मग गोव्याच्या 'हार्ट लेक'चं निसर्गसौंदर्य अनुभवाच

Sameer Amunekar

हार्ट लेक

गोवा हे नुसतेच समुद्रकिनारे, चर्च आणि नाईटलाइफसाठी प्रसिद्ध नाही, तर इथे काही अप्रतिम आणि अद्याप फारसे न पाहिलेले निसर्गरम्य ठिकाणेही आहेत. त्यातीलच एक अप्रतिम ठिकाण म्हणजे हार्ट लेक.

Goa Heart Lake | Dainik Gomantak

हृदयाच्या आकाराचं तलाव

हार्ट लेक, जी वास्को द गामा शहराजवळ, दक्षिण गोव्यात आहे. या तलावाचे विशेष आकर्षण म्हणजे त्याचा हृदयाच्या आकाराचा निसर्गनिर्मित रचना, जी पर्यटकांना आणि निसर्गप्रेमींना वेड लावते.

Goa Heart Lake | Dainik Gomantak

निसर्गाच्या कुशीत

हार्ट लेक दक्षिण गोव्यातील वास्को द गामा या शहराच्या जवळ स्थित आहे. हे ठिकाण निसर्गाच्या कुशीत, घनदाट झाडांनी वेढलेले असून समुद्रकिनाऱ्याच्या अगदी जवळ आहे.

Goa Heart Lake | Dainik Gomantak

विमानतळापासून जवळ

गोव्यातील दाबोळी आंतरराष्ट्रीय विमानतळ हार्ट लेकपासून अवघ्या काही किमी अंतरावर आहे.

Goa Heart Lake | Dainik Gomantak

जाण्याची सोय

गोव्याच्या प्रमुख शहरांमधून वास्को द गामा पर्यंत बस किंवा खासगी वाहनाने जाता येते. हार्ट लेक गाठण्यासाठी स्थानिक मार्गदर्शन उपयुक्त ठरू शकते.

Goa Heart Lake | Dainik Gomantak

फोटोग्राफी

हार्ट लेकचा सर्वात मोठा विशेष म्हणजे हा तलाव हृदयाच्या आकाराचा दिसतो. निसर्गनिर्मित ही रचना पाण्याच्या स्वच्छतेमुळे आणि भोवतालच्या हिरवाईमुळे अधिकच सुंदर वाटते. ड्रोन फोटोग्राफीसाठी हे ठिकाण एकदम योग्य आहे.

Goa Heart Lake | Dainik Gomantak
Summer Tips | Dainik Gomantak
उष्माघात झाल्यावर काय करावं?