24 तासांसाठी संपूर्ण गाव राहतं उपाशी; काय आहे बेतकीच्या 'मंडोदरी'ची कथा?

Akshata Chhatre

अनेक मंदिरं

गोवा पर्यटनातील जर का महत्वाचा भाग कुठला असले तर तो म्हणजे इथली संस्कृती. गोव्यात अनेक मंदिरं पाहायला मिळतात आणि या प्रत्येक मंदिराची एक वेगळी गोष्ट आहे.

Mandodari Temple| Betki Temple Story | Goa Travel | Goa Temples | Dainik Gomantak

आख्यायिका

आता या आख्यायिका आहेत की त्यांना ऐतिहासिक बळ आहे हे ठोसपणे सांगता येत नाही, मात्र स्थानिक आजही या कथा पुढील पिढीपर्यंत पोचोचवतात.

Mandodari Temple| Betki Temple Story | Goa Travel | Goa Temples | Dainik Gomantak

मंडोदरीचं मंदिर

अशाच खास मंदिरांपैकी एक म्हणजे बेतकी येथील मंडोदरीचं मंदिर. लक्ष्यात घ्या हे मंदोदरी नाही तर देवी मंडोदरीचं देऊळ आहे. आता कोण आहे ही देवी?

Mandodari Temple| Betki Temple Story | Goa Travel | Goa Temples | Dainik Gomantak

दोन लहान मुलांचा बळी

बेतकी या गावात अनेक वर्षांपूर्वी नदीला बांद बसत नसल्याची एक आख्यायिका आहे. तेव्हा यावर उपाय म्हणून एका तांत्रिकाने गावकऱ्यांना दोन लहान मुलांचा बळी द्यायला सांगितलं होतं.

Mandodari Temple| Betki Temple Story | Goa Travel | Goa Temples | Dainik Gomantak

आमिष

गावाच्या सीमेवर एक गरीब कुटुंब राहायचं, जिथे वडील नसल्याने एकटी आईच दोन मुलांची काळजी घेत असे, एक दिवशी आई घरी नसतानाच गावकऱ्यांनी केळ्यांचं आमिष दाखवून दोन मुलांचा बळी दिला होता.

Mandodari Temple| Betki Temple Story | Goa Travel | Goa Temples | Dainik Gomantak

आईची माफी

यानंतर संतापलेल्या आईने गावाला २४ वर्षांसाठी इथे कुठलंही पीक न उगण्याचा शाप दिला. दुष्काळामुळे लोकांना गाव सोडून जाणं भाग झालं. मात्र काही वर्षानंतर फडते नावाच्या ग्रामस्थांनी या दुखावलेला आईची माफी मागितली.

Mandodari Temple| Betki Temple Story | Goa Travel | Goa Temples | Dainik Gomantak

मंडोदरीचं मंदिर

तेव्हा तिने गावकऱ्यांना मंडोदरी आणि तिच्या भावाचं मंदिर बांधायला सांगितलं आणि वर्षातून एकदा संपूर्ण दिवस गावात भात शिजणार नाही अशी अट घातली, आजही गावकरी या वचनाचं पालन करतात आणि मंडोदरी गावाची आराध्य देवी आहे.

Mandodari Temple| Betki Temple Story | Goa Travel | Goa Temples | Dainik Gomantak
सिलेंडरचा सिक्रेट कोड