पर्यटकांच्या सेवेसाठी.. सुरक्षेसाठी... स्वच्छ- सुंदर गोव्यासाठी पर्यटन खात्याची अनोखी भेट

Ganeshprasad Gogate

गोवा हे पर्यटनदृष्ट्या लोकप्रिय राज्य समजले जाते.

Goa | Dainik Gomantak

पर्यटकांना भुरळ-

समुद्रकिनारे, कॅसिनो, भव्यदिव्य मंदिरे, पोर्तुगीजकालीन वास्तू या आणि अशा कित्येक गोष्टी येणाऱ्या पर्यटकांना भुरळ घालतात

Goa | Dainik Gomantak

'बीच वेलियेशन रिपोर्टिंग अ‍ॅप'-

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर होणाऱ्या अनियमित गोष्टी रोखण्यासाठी पर्यटन खात्याने 'बीच वेलियेशन रिपोर्टिंग अ‍ॅप' सुरू केले आहे.

Goa | Dainik Gomantak

अ‍ॅपचे उद्घाटन-

गुरुवारी पणजी येथे पर्यटन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी या अ‍ॅपचे उद्घाटन केले.

Goa | Dainik Gomantak

गैरप्रकार रोखण्यासाठी-

यावेळी पर्यटन किनाऱ्यावर कचरा टाकणे, पर्यटकांची सतावणूक करणे, कचरा टाकणे, जेवण तयार करणे आदी सुमारे 16 प्रकारांचे गैरप्रकार तथा अनियमितपणा, दलाली करणे इत्यादी गोष्टी रोखण्यासाठी हे अ‍ॅप सुरू करण्यात आले आहे.

Goa | Dainik Gomantak

कारवाई करणार-

लोकांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून घ्यावे व किनाऱ्यावर कुठलीही अनैतिक गोष्ट वा गैरप्रकार दिसला तर त्याचा फोटो काढून किंवा व्हिडिओ करून या अ‍ॅपवर पाठवावा. त्यानंतर संबंधित विभाग त्यावर त्वरित कारवाई करणार असल्याचे खंवटे यांनी सांगितले.

Goa | Dainik Gomantak
Rashid Khan | Dainik Gomantak
आणखी पाहण्यासाठी