Goa Assembly Session: विधानसभा अधिवेशनाच्या 'शून्य तासा'ला काय काय घडले? पहा निवडक घडामोडी

Sameer Panditrao

आगोंद

आगोंद येथील व्यावसायिक आस्थापने सिलबंद करण्याच्या खटल्यात राज्य सरकार हस्तक्षेप अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत दिली.

Goa Assembly Session | Dainik Gomantak

पंचायतींना अनुदान

२०२२ पासून पंचायतींना अनुदान मिळालेले नाही. ते लवकर देण्याकडे सरकारने लक्ष पुरवावे. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी शून्य तासाला हा विषय उपस्थित केला.

Goa Assembly Session | Dainik Gomantak

साळावली

साळावलीच्या मुख्य जलवाहिनीवरून रस्ता बांधण्यास कोणासही परवानगी दिली जात नाही. एकाला परवानगी नाकारली तर दुसऱ्याला दिली , असे का अशी विचारणा आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी केली.

Goa Assembly Session | Dainik Gomantak

कल्याणकारी योजना

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजनांचा लाभ महिन्याच्या ठरावीक तारखेलाच द्यावा. त्यांना औषधे विकत घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो, त्यामुळे विलंब करू नये, अशी मागणी आमदार क्रुझ सिल्वा यांनी केली.

Goa Assembly Session | Dainik Gomantak

कागदपत्रे

जिल्हाधिकारी कार्यालय पातळीवर कागदपत्रे पूर्वीप्रमाणेच साक्षांकित करावीत, असा आदेश देण्यात येईल, असे महसूलमंत्री मोन्सेरात यांनी विधानसभेत सांगितले. आमदार सरदेसाई यांनी शून्य तासाला हा विषय मांडला होता.

Goa Assembly Session | Dainik Gomantak

इतिहास

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचा इतिहास पाठ्यपुस्तकांत आला पाहिजे, अशी मागणी वास्कोचे आमदार दाजी साळकर यांनी विधानसभेत शून्य तासाला केली.

Goa Assembly Session | Dainik Gomantak

शापोरा

शापोरा नदीतील गाळ उपसण्यांच्या विषयात मुख्यमंत्री व्यक्तिशः लक्ष देणार आहेत. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शून्य तासाला हे आश्वासन विधानसभेत दिले.

Goa Assembly Session | Dainik Gomantak
म्हणून पणजी झाली गोव्याची राजधानी