Pramod Yadav
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून (दि.१५ जुलै) सुरु झाले आहे.
पहिल्याच दिवशी विरोधकांनी अधिवेशात गदारोळ घातला, आमदार डिकॉस्ता यांच्या चर्चेसाठी न आलेल्या एसटी आरक्षणाच्या मुद्यांवरुन सभागृहात गोंधळ केला.
सत्ताधारी पक्षातील आमदार कृष्णा दाजी साळकरांनी काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्या विरोधात हक्क भंगाची कारवाईची मागणी केली.
तसेच, सभापती रमेश तवडकरांचा अवमान केल्याप्रकरणी माफी मागण्याची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह इतर नेत्यांनी ही मागणी लावून धरली.
अखेर सभापती रमेश तवडकरांनी सुरुवातील अर्ध्या तासासाठी सभागृहाचे कामकाज तहकूब केले.
सभागृह पुन्हा सुरु झाल्यानंतर सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी हक्कभंग कारवाईची मागणी लावून धरली सभागृहात गोंधळ झाल्याने सभापतींनी पुन्हा अर्धा तासांसाठी सभागृह तहकूब केले.