Manish Jadhav
गोव्यावर निसर्गानं केलेली उधळण पाहण्यासठी दरवर्षी लाखो पर्यटक येतात.
गोव्यात अनेक प्रसिद्ध ठिकाणे आहेत. पर्यटक गोव्यात आल्यानंतर खासकरुन येथील समुद्रकिनारे, क्रूझ, क्लब इत्यादी ठिकाणी जाणे पसंद करतात. पण तुम्ही गोव्यातील प्रसिद्ध लेणीही पाहिली पाहिजे.
आज (25 ऑगस्ट) आपण या वेबस्टोरीच्या माध्यमातून गोव्यातील प्रसिद्ध लेणीबद्दल जाणून घेणार आहोत. ही लेणी हरवळे येथे आहे.
हरवळे लेण्यांचा उल्लेख पुराणातही आढळतो. या लेण्या पणजीपासून 31 किमी दूर आहेत.
असे म्हणतात की, पांडव याच लेण्यांमध्ये काही काळ थांबले होते. या लेण्या पांडवांची गुहा या नावानेही ओळखली जाते.
या लेण्यांमध्ये पांडवांचे अस्तित्व सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नसला तरी स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे.
या गुहा 7व्या शतकात बांधल्या गेल्याचे इतिहासकारांचे म्हणणे आहे.