Pranali Kodre
गोव्याकडून खेळणारा सुयश प्रभुदेसाईचा जन्म 6 डिसेंबर 1997 रोजी झाला.
सुयश अष्टपैलू क्रिकेटपटू असून उजव्या हाताने फलंदाजी आणि वेगवान गोलंदाजी करतो.
सुयशने आत्तापर्यंत गोव्याकडून खेळताना शानदार कामगिरी केली आहे. नुकतेच विजय हजारे २०२३-२४ स्पर्धेतही त्याने ५० हून अधिकच्या सरासरीने धावा केल्या आहेत.
आत्तापर्यंत सुयश 26 प्रथम श्रेणी सामने, 47 लिस्ट ए सामने आणि 46 टी20 सामने खेळले आहेत. (आकडेवारी 6 डिसेंबर 2023 पर्यंत).
सुयशने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 1629 धावा, लिस्ट एमध्ये 1190 धावा आणि टी20 सामन्यांमध्ये 873 धावा केल्या आहेत. तसेच त्याने या तिन्ही प्रकारात मिळून 19 विकेट्स घेतल्या आहेत.
सुयशने गोव्याच्या संघाने नेतृत्व देखील केले आहे.
सुयश आयपीएलमध्येही खेळतो. तो आयपीएल खेळणारा तिसरा गोमंतकीय खेळाडू आहे. त्याच्यापूर्वी स्वप्नील अस्नोडकर व शदाब जकाती हे गोमंतकीय आयपीएल स्पर्धेत खेळले होते.
सुयशने आयपीएल 2022 साली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून पदार्पण केले होते. त्याला बेंगलोरने 30 लाखांच्या किमतीत संघात सामील करून घेतले आहे. त्याने आयपीएलमध्ये 10 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने १०२ धावा केल्या आहेत.