Ganeshprasad Gogate
पेडणे तालुक्यातील आगरवाडा मध्ये मिठाचे उत्पादन होत असून या मिठागरामुळेच या गावाला 'आगरवाडा' हे नाव रूढ झाले आहे.
पोर्तुगिजकाळापूर्वी आगरवाडा गावात मिठाचे उत्पादन होते.
इथल्या मिठाचा दर्जा गोव्यातल्या इतर मिठापेक्षा उच्च प्रतीचा असल्याने गोव्यात व गोव्याबाहेरही या मिठाला चांगली मागणी होती.
आगरवाडा हा गाव शापोरा नदीच्या काठावर आहे. या नदीच्या काठावर 'आगरपोय' हा बंधारा असून त्यावर 'मानस' बसवून शापोरा नदीचे खारे पाणी आगरामध्ये घेतले जाते.
हे मिठागर तयार करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. येथील शेतीच्या व्यावसायिकाला पुरक असा व्यवसाय असल्यामुळे बहुतेक आगरवाडा गावातील लोक मीठ व्यवसायात गुंतले आहेत. .