Kavya Powar
राज्यात गेल्या वर्षभरात सुमारे तब्बल 2,700हून अधिक अपघात झाले आहेत.
यामध्ये होणाऱ्या मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे
अनेक ठिकाणी महामार्ग झाले असल्याने हे रस्ते ओलांडताना अनेकजण मृत्युमुखी पडत आहेत.
वाहतूक विभागानुसार, चालक मद्यप्राशन करून वाहन चालवत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.
पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी 1 जानेवारी ते 30 नोव्हेंबरपर्यंत सुमारे 1100 जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
मागील वर्षी याच काळात 850 जणांविरुद्ध कारवाई झाली होती.
त्यामुळे गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना वाहतुकीचे नियम पाळणे बंधनकारक असून नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत