Kavya Powar
जुने गोवेतील सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त आज सोमवारी 4 डिसेंबरला सुरू झाले आहे
गोवा, दमण आणि दीवचे आर्चबिशप फिलीप नेरी कार्डिनल फेर्रांव यांची उपस्थिती असणार आहे
सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे फेस्त जगप्रसिद्ध असल्याने मोठ्या संख्येने देश – विदेशातून भाविक येतात.
फेस्तसाठी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे
त्याचसोबत वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी विशेष देखभाल करण्यात येत आहे
दरम्यान, पहाटे 4 वाजल्यापासून प्रार्थनेला सुरुवात झाली आहे
गोव्यातील मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार आणि इतर मान्यवरही फेस्तला उपस्थित असणार आहेत.
तसेच सुरक्षेसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकमधून बॉम्ब शोधक पथकही फेस्तसाठी तैनात असणार आहे