Ganeshprasad Gogate
31 डिसेम्बरचे सेलिब्रेशन करण्यासाठी देशभरातून पर्यटक गोव्यात येऊ लागले आहेत.
समुद्रकिनारे, शॅक, पंचतारांकित हॉटेल्स, night club गर्दीने फुल्ल होऊ लागले आहे.
मात्र या सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी गोवा पोलीस दिवसरात्र पहारा ठेवत आहेत.
परराज्यातून येणाऱ्या वाहनांची गोव्यात entry करताना सुरक्षिततेच्या कारणास्तव चेक पोस्टवर तपासणी केली जात आहे.
तसेच महामार्गावर आणि महत्वाच्या शहरातील वाहतुकीवर पोलिसांची नजर असणार आहे.
त्याप्रमाणेच समुद्रकिनाऱ्यांवर दृष्टी मरिनचे पथक कार्यरत आहेत.