Sameer Amunekar
पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा उपाय सावळ्या त्वचेवरील मृत पेशी काढून टाकतो. बेसन, चिमूटभर हळद आणि थोडे दही एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावर झटपट चमक येते.
सावळ्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफड जेल उत्तम आहे. रोज रात्री झोपण्यापूर्वी ताजं कोरफड जेल लावल्याने त्वचेचा पोत सुधारतो आणि चेहरा तजेलदार दिसतो.
मध त्वचेला ओलावा देतं, तर लिंबू नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतं. हे मिश्रण लावल्याने त्वचेवरील डाग कमी होतात आणि सावळी त्वचा अधिक चमकदार (Glowy) दिसते.
पपईमध्ये 'पपेन' एन्झाईम असते, जे त्वचेला नैसर्गिकरीत्या उजळवण्यास मदत करते. पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर १०-१५ मिनिटे लावल्याने त्वचा फ्रेश दिसते.
कच्चे दूध हे एक नैसर्गिक क्लिन्झर आहे. कापसाच्या मदतीने रोज कच्चे दूध चेहऱ्यावर लावल्याने त्वचेचा काळपटपणा दूर होतो आणि नैसर्गिक चमक मिळते.
बाहेरून लावण्यासोबतच शरीरातूनही त्वचा हायड्रेट असणे गरजेचे आहे. दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्यायल्याने टॉक्सिन्स बाहेर पडतात आणि त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो.
सौंदर्यासाठी ७-८ तासांची शांत झोप आवश्यक आहे. झोप पूर्ण झाल्यामुळे डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात आणि चेहरा थकलेला न दिसता सतेज दिसतो.