Sameer Amunekar
हिवाळा सुरु झाला की सगळ्यात जास्त त्रास होतो तो आपल्या त्वचेला. दिवसभर थंड वारा, कमी आर्द्रता आणि कोरड्या वातावरणाचा आपल्या त्वचेला त्रास होतो.
दिवसभर जमा झालेली धूळ, प्रदूषण आणि मेकअप काढण्यासाठी डबल क्लीन्सिंग करा. यामुळे त्वचा श्वास घेते आणि सकाळी चेहरा नैसर्गिकरित्या तजेलदार दिसतो.
अल्कोहोल-फ्री टोनर वापरल्याने त्वचा शांत होते आणि पुढील स्किनकेअरचे परिणाम दुप्पट मिळतात.
ग्लो आणण्यासाठी व्हिटॅमिन-C उत्तम! पिग्मेंट कमी होते, त्वचा उजळते आणि नैसर्गिक ब्राइटनेस वाढतो.
रात्री त्वचा स्वतःची दुरुस्ती करते. त्यामुळे हायालुरॉनिक अॅसिड किंवा सिरेमाईड्स असलेली रात्रीची क्रीम लावा.
ग्लो हा फक्त चेहऱ्यावर नसतो. मऊ, गुलाबी ओठही महत्त्वाचे. स्लीपिंग लिप मास्क लावा.
हलका स्टीम आणि ग्वा-शा/रोलर मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते आणि चेहरा अधिक चमकदार दिसतो (आठवड्यातून 2 वेळा).
किमान 7–8 तास झोप घ्या. योग्य झोप म्हणजे नैसर्गिक ग्लोचे सर्वात मोठे रहस्य!