Akshata Chhatre
आजकाल चेहऱ्यावरून वय ओळखणे कठीण झाले आहे, कारण अगदी कमी वयातही सुरकुत्या दिसू लागल्या आहेत.
यावर मात करण्यासाठी गुलाब जल एक स्वस्त आणि अत्यंत प्रभावी उपाय आहे.
चमकदार आणि फ्रेश
चेहरा दिवसातून जितक्या वेळा धुवाल, त्यानंतर चेहऱ्यावर थेट गुलाब जल शिंपडा, यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि फ्रेश राहते.
कडुलिंबाच्या पावडरमध्ये गुलाब जल मिसळून हा लेप चेहऱ्यावर लावा, यामुळे मुरुमे कमी होतात आणि त्वचा मऊ, स्वच्छ आणि चमकदार दिसू लागते.
चंदन पावडरमध्ये गुलाब जल मिसळून चेहऱ्यावर लावा. हा लेप चेहऱ्याची त्वचा टाईट करतो आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत करतो. हे वृद्धत्वाची चिन्हे कमी करण्यास उपयुक्त आहे.
मुलतानी मातीमध्ये गुलाब जल मिसळून चेहऱ्यावर लावा, यामुळे त्वचेचे पोर्स आकसण्यास मदत होते. तसेच, चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते.
बेसनमध्ये थोडी हळद आणि गुलाब जल मिसळून लावा,यामुळे चेहऱ्यावर जमलेला काळेपणा निघून जातो आणि त्वचेचा निर्जीवपणा कमी होतो.