Sameer Amunekar
पार्लरच्या महागड्या ट्रीटमेंट्स आणि केमिकलयुक्त क्रिम्स वापरून थकला आहात? मग आता तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये या जादुई 'गुलाबी पाण्याचा' (Pink Water) समावेश करा.
हे जादुई पाणी दुसरं तिसरं काही नसून नैसर्गिक 'बीटरूट डिटॉक्स वॉटर' (Beetroot Detox Water) आहे. बीटरूटमुळे या पाण्याला एक सुंदर गुलाबी रंग येतो आणि ते आरोग्यासाठीही वरदान आहे.
बीटरूटमध्ये मुबलक प्रमाणात लोह, व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. हे घटक शरीरातील रक्त शुद्ध करतात, ज्यामुळे चेहऱ्यावर आतून नैसर्गिक आणि गुलाबी चमक (Natural Glow) येते.
बनवण्याची कृती अगदी सोपी आहे. एका काचेच्या बाटलीत किंवा जारमध्ये पाणी घ्या. त्यात बीटरूटचे छोटे तुकडे, थोडासा पुदिना आणि लिंबाचे काही तुकडे टाकून मिक्स करा.
तयार केलेले हे पाणी रात्रभर किंवा किमान ३-४ तास तसेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी रिकाम्या पोटी किंवा दिवसभर थोडे-थोडे करून हे पाणी प्या.
हे पाणी नियमित प्यायल्याने शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर पडतात. यामुळे चेहऱ्यावरील मुरुमे (Pimples), काळे डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मोठी मदत होते.
फक्त बाह्य उपचारांवर अवलंबून न राहता, शरीराला आतून पोषण द्या. आजपासूनच हे 'गुलाबी पाणी' प्यायला सुरुवात करा आणि काही दिवसांतच तुमच्या चेहऱ्यावरील फरक पाहा!