Glowing Skin: हिरोईनसारखा नैसर्गिक ग्लो हवाय? सकाळपासून रात्रीपर्यंतचं 'हे' स्किन केअर रूटीन ठरेल फायदेशीर

Sameer Amunekar

सौम्य क्लेंझर

सकाळी उठल्यानंतर त्वचा सौम्य फेसवॉशने स्वच्छ करा. त्यामुळे रात्री साचलेला तेलकटपणा आणि घाण दूर होऊन त्वचा फ्रेश दिसते.

Glowing Skin | Dainik Gomantak

व्हिटॅमिन C सीरम

त्वचेला नैसर्गिक चमक देण्यासाठी व्हिटॅमिन C सीरम उपयुक्त ठरू शकतो. यामुळे त्वचा उजळ दिसण्यास आणि डाग कमी होण्यास मदत होते.

Glowing Skin | Dainik Gomantak

मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन

त्वचेचा ओलावा टिकवण्यासाठी मॉइश्चरायझर लावा. त्यानंतर SPF 30 किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावल्याने सूर्याच्या किरणांपासून संरक्षण मिळते.

Glowing Skin | Dainik Gomantak

पुरेसं पाणी आणि हेल्दी आहार

त्वचेचा ग्लो फक्त बाहेरून नाही तर आतूनही येतो. भरपूर पाणी प्या आणि फळे, भाज्या व प्रथिनयुक्त आहाराचा समावेश करा.

Glowing Skin | Dainik Gomantak

संध्याकाळी मेकअप पूर्णपणे काढा

मेकअप किंवा धूळ त्वचेवर रात्रभर राहू देऊ नका. क्लेंझिंग ऑइल किंवा मायसेलर वॉटरने चेहरा स्वच्छ करून नंतर फेसवॉश वापरा.

Glowing Skin | Dainik Gomantak

रात्री सीरम आणि नाईट क्रीम

रात्री त्वचा स्वतःची दुरुस्ती करते. त्यामुळे हायल्युरोनिक अॅसिड, नायसिनामाइड किंवा नाईट क्रीमचा वापर केल्यास त्वचा अधिक मऊ आणि निरोगी राहते.

Glowing Skin | Dainik Gomantak

पुरेशी झोप घ्या

दररोज 7-8 तासांची शांत झोप त्वचेसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. चांगली झोप घेतल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो दिसून येतो आणि त्वचा ताजीतवानी राहते.

Glowing Skin | Dainik Gomantak

पावसाळ्याच्या दिवसांत असा आणा चेहऱ्यावर ग्लो, ट्राय करा 'या' 7 टिप्स

येथे क्लिक करा