Sameer Amunekar
पावसाळ्यात जरी जास्त तहान लागत नसली, तरी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे. पाणी त्वचेमधील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते आणि चेहऱ्यावर नॅचरल चमक आणते.
पावसाळ्यातील दमट हवामानामुळे चेहऱ्यावर चिकटपणा आणि घाण साचते. यासाठी दिवसातून किमान दोन वेळा सौम्य फेसवॉशने चेहरा धुवा, जेणेकरून रोमछिद्रे स्वच्छ राहतील.
ऋतू कोणताही असो, मॉइश्चरायझर स्किप करू नका. पावसाळ्यात त्वचा तेलकट होऊ शकते, म्हणून भारी क्रिम्सऐवजी जेल-बेस्ड किंवा वॉटर-बेस्ड मॉइश्चरायझरचा वापर करा.
मृत त्वचा काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एकदा हलक्या हाताने स्क्रब करा. यासाठी साखर आणि मध किंवा ओट्स आणि मधाचे मिश्रण सर्वोत्तम ठरते.
जरी आकाश ढगाळ असले, तरी सूर्याचे युव्ही (UV) किरण त्वचेपर्यंत पोहोचतातच. त्यामुळे घराबाहेर पडताना एसपीएफ (SPF) युक्त सनस्क्रीन लावणे अजिबात विसरू नका.
बाहेरील तेलकट खाणे टाळा आणि आहारात ताजी फळे, हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. व्हिटॅमिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्सयुक्त आहार त्वचेला आतून निरोगी बनवतो.
पावसाळ्यात चेहऱ्यावर जास्त हेवी मेकअप करणे टाळा. यामुळे त्वचेचे पोर्स बंद होऊ शकतात. शक्यतो वॉटरप्रूफ किंवा अगदी हलका मेकअप करा जेणेकरून त्वचा श्वास घेऊ शकेल.