Sameer Amunekar
पुरेशी झोप, स्क्रीन टाइममध्ये ब्रेक आणि डोळ्यांभोवती हलका मसाज केल्याने थकवा कमी होण्यास मदत होते. डोळ्यांचा थकवा कमी झाला की चेहराही फ्रेश दिसतो.
ओठ कोरडे पडू नयेत यासाठी नियमित मॉइश्चरायझर किंवा लिप बाम वापरा. पुरेसे पाणी पिणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
टाळूवर अतिरिक्त तेल, घाण किंवा कोंडा जमा झाल्यास अस्वस्थता निर्माण होऊ शकते. केस आणि स्काल्पची नियमित स्वच्छता राखल्याने एकूण लूक फ्रेश दिसतो.
फक्त चेहऱ्यावर क्रीम लावून मानेला विसरू नका. चेहऱ्याप्रमाणेच मानेवरही मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावण्याची सवय ठेवा.
हात वारंवार धुतल्याने त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे हात धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावा आणि उन्हात बाहेर पडताना हातांवरही सनस्क्रीन वापरा.
ग्लो केवळ बाहेरून लावलेल्या उत्पादनांवर अवलंबून नसतो. दिवसभर पुरेसे पाणी पिणे आणि फळे-भाज्यांचा समावेश असलेला संतुलित आहार घेणे त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
अनियमित झोप आणि सततचा ताण चेहऱ्यावर थकवा जाणवू शकतो. त्यामुळे रोज नियमित झोप घेणे, व्यायाम करणे आणि रिलॅक्स होण्यासाठी वेळ देणेही ग्लो टिकवण्यासाठी महत्त्वाचे आहे.