गोमन्तक डिजिटल टीम
Global Commission on the Economics of Water या आंतरराष्ट्रीय गटाने एक अहवाल प्रकाशित केला आहे.
या अहवालानुसार कमकुवत आर्थिक यंत्रणा, जमिनीचा विनाशकारी वापर आणि जलस्त्रोतांच्या गैरव्यवस्थापनाला हवामान बदलाची जोड मिळाल्याने जागतिक जल चक्रावर अभूतपूर्व ताण आला आहे.
तीव्र पाणीटंचाईमुळे २०५० पर्यंत जगाचे अन्नधान्य उत्पादन निम्म्यावर येऊ शकते. त्यामुळे मोठ्या आर्थिक परिणामांचाही सामना करावा लागू शकतो.
जगातील तीन अब्ज लोक व निम्म्याहून अधिक अन्नधान्य उत्पादन होणाऱ्या भागांना पाणीटंचाई भेडसावत आहे. अनेक शहरांची भूजल पातळीही घटत आहे,
जगभरातच पाण्याचे महत्त्व ओळखले जात नसल्याने पाण्याच्या बेसुमार वापराला प्रोत्साहन मिळत आहे.
डेटा सेंटर व कोळशावर चालणाऱ्या ऊर्जा प्रकल्पांमुळेही पाणीटंचाईची तीव्रता वाढत आहे
पावसाचा पॅटर्न स्थिर राहण्यासाठी व जमिनीत कार्बनच्या साठ्याला मदत करणाऱ्या जमीन व वनस्पतींमधील आर्द्रतायुक्त पाण्याकडे दुर्लक्ष केले जाते असेही अहवालात दिले आहे.