Manish Jadhav
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टी20 सामन्यात 2 गडी राखून थरारक विजय मिळवला. 173 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 6 बाद 122 अशी बिकट अवस्था असताना ग्लेन मॅक्सवेलने विजयी खेळी साकारली.
मॅक्सवेलने 36 चेंडूंमध्ये 8 चौकार आणि 2 षटकारांसह 62 धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या याच खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या जबड्यातून विजय हिसकावून आणला.
आपल्या शानदार खेळीसाठी ग्लेन मॅक्सवेलला 'प्लेअर ऑफ द मॅच' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यशस्वी धावांचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत त्याने इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉस बटलरला मागे सोडले.
मॅक्सवेलने आतापर्यंत यशस्वी धावांचा पाठलाग करताना 1231 धावा केल्या आहेत, तर बटलरच्या नावावर 1213 धावा आहेत. मॅक्सवेल आता या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
या दमदार खेळीच्या जोरावर मॅक्सवेल आता यशस्वी टी20 आंतरराष्ट्रीय रन चेजमध्ये किंग कोहलीचा विश्वविक्रम मोडण्याच्या जवळ पोहोचला.
कोहलीचा 1651 धावांचा विश्वविक्रम मोडण्यासाठी मॅक्सवेलला आता फक्त 421 धावांची गरज आहे. या यादीत पाकिस्तानचा बाबर आझम दुसऱ्या क्रमांकावर (1403 धावा) आहे.
टी-20 मध्ये पदार्पण केल्यापासून मॅक्सवेलने 149 टी20 सामन्यांत 2833 धावा केल्या आहेत, ज्यात 5 शतके आणि 12 अर्धशतकांचा समावेश आहे. तो गोलंदाजीतही संघासाठी उपयुक्त ठरला असून त्याने 77 विकेट्स घेतल्या आहेत.