Sameer Amunekar
दररोज एकाच वेळी अभ्यासाची सवय लावल्यास मुलांची एकाग्रता वाढते आणि अभ्यास नियमित होतो.
टीव्ही, मोबाईल किंवा इतर विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर, शांत आणि उजेड असलेल्या ठिकाणी अभ्यास केल्याने लक्ष अधिक केंद्रित राहते.
सलग तासन्तास अभ्यास करण्यापेक्षा प्रत्येक 30-45 मिनिटांनी 5-10 मिनिटांचा ब्रेक घेतल्यास थकवा कमी होतो.
फळे, सुका मेवा, दूध आणि पौष्टिक आहार मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी उपयुक्त ठरतो. दिवसभर पुरेसं पाणी पिण्याची सवयही लावा.
फक्त घोकंपट्टी करण्याऐवजी विषय समजून घेण्यावर भर द्या. त्यामुळे मुलांची विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढतो.
दररोज वयानुसार पुरेशी झोप घेतल्यास स्मरणशक्ती सुधारते, एकाग्रता वाढते आणि शिकलेला अभ्यास अधिक चांगल्या प्रकारे लक्षात राहतो.
मुलांच्या प्रत्येक छोट्या यशाचं कौतुक करा. सकारात्मक शब्द आणि प्रोत्साहनामुळे त्यांचा अभ्यासातील उत्साह व आत्मविश्वास वाढतो.