Akshay Nirmale
गोव्यात राजधानी पणजीत मांडवी नदीत एक मोठा कॅसिनो उभारण्यात येणार आहे.
कॅसिनोवाहू नौकेतच हा कॅसिनो असेल पण त्याचा आकार आत्ताच्या कॅसिनोंपेक्षा खूप मोठा असेल.
सध्या येथे असलेल्या ‘डेल्टीन रॉयल’पेक्षा दुप्पट आकाराची ही कॅसिनोवाहू नौका असणार आहे.
1 लाख चौरस फूट आकाराची ही नवी नौका असणार आहे.
सध्या ‘डेल्टीन रॉयल’वर एकावेळी 1000 जण गेम्समध्ये सहभागी होऊ शकतात. तर नव्या नौकेत ही क्षमता दुप्पट असेल.
1 ऑक्टोबरपासून जीएसटी लागू झाल्यानंतर कंपन्यांनी उलाढाल, नफा वाढवण्यासाठी आकार वाढवण्याचे ठरवल्याचे समजते.
नव्या नौकेसाठी परवाने मिळवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.