गोव्यातील 'या' फिश करींवर जगभरातले खवय्ये फिदा...

Akshay Nirmale

बीच शॅक्समध्ये फिश करी

गोवा पर्यटन मंत्रालयाने बीचवरील शॅक्समध्ये फिश करी आणि राईस ठेवणे तसेच डिस्प्ले करणे बंधनकारक केले आहे. तसा निर्णय घेतला आहे.

Goa Beach Shacks | google image

पारंपरिक भोजन

फिश करी आणि राईस हे पारंपरिक गोवन भोजन आहे. येथे फिश करीमध्ये व्हरायटीही पाहायला, चाखायला मिळते.

Goan Fish Curry | google image

किसमूर

किसमूर ही गोव्याची क्लासिक फिश करी डिश आहे. यात मासे, कांदे आणि हर्बसचा वापर असतो. भात, भाजलेल्या खोबरे फ्राय प्रॉन्स किंवा स्क्विडसोबत ही डिश खातात. डिशचा सुगंध मस्त असतो.

Goan Fish Curry | google image

शॅकुती

शॅकुती ही तिखट करी आहे. यात मिरे, लवंग, दालचिनी, कडिपत्ता, धने पावडर अशा अनेक मसाल्यांमुळे तिखट चव येते. यात सह ही आमटी बनवतात. व्हाईट राईस आणि मोहरीच्या लोणच्यासोबत ही डिश खातात.

Goan Fish Curry | google image

आंबोटिक

आंबोटिक ही आंबट आणि तिखट अशा चवीची ही करी असते. यात चिंच आणि लसणाचा वापर केला जातो. ही डिशमध्ये बहुतेकदा किंगफिशचा वापर करतात. बासमती भातासोबत ही करी खाणे पसंत केले जाते.

Goan Fish Curry | google image

बांगडा करी

बांगडा माशाची ही करी असते. यात टोमॅटो, कांदा, लसू, आले आणि चिंचेची पेस्ट वापरतात. स्टीम्ड राईस आणि चपातीसोबत बांगडा करी खाणे हा ऑथेंटिक गोवन अनुभव असतो.

Goan Fish Curry | google image

पॉम्फ्रेट करी

यात पॅन फ्राय केलेला पापलेट मासा हा जाडसर ग्रेव्हीमध्ये असतो. ही ग्रेव्ही नारळाचे दूध, चिंचेचा कोळ, मिरची, आले, लसून, कांदा आणि मसाले वापरतात. स्टीम्ड राईससोबत ही करी खाणे म्हणजे जिभेचे चोचले पुरवणे.

Goan Fish Curry | google image
Orin Julie | Dainik Gomantak