Ghosalgad Fort: जंजिऱ्याच्या सिद्दीसाठी कर्दनकाळ ठरला मराठ्यांचा 'घोसाळगड'; स्वराज्याच्या सागरी सीमेचा बुलंद पहारेकरी

Manish Jadhav

घोसाळगड किल्ला

घोसाळगड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात आहे. रोहा शहरापासून साधारणपणे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर हा किल्ला एका स्वतंत्र डोंगररांगेवर उभा आहे.

Ghosalgad Fort | Dainik Gomantak

किल्ल्याची रचना

हा किल्ला आकारानं अरुंद असून त्याची लांबी जास्त आहे. याला 'वीरगड' असेही म्हटले जाते. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत पाहायला मिळतात.

Ghosalgad Fort | Dainik Gomantak

ऐतिहासिक महत्त्व

हा किल्ला प्रामुख्याने जंजिऱ्याच्या सिद्दीवर आणि रेवदंडा परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात असे. कोकण किनारपट्टीवरील व्यापारावर नियंत्रण मिळवण्यासाठी या किल्ल्याचे स्थान मोक्याचे होते.

Ghosalgad Fort | Dainik Gomantak

शिवाजी महाराजांचे साम्राज्य

1648 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला आदिलशहाकडून जिंकून घेतला. महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी करुन त्याचे नाव 'वीरगड' ठेवले होते.

Ghosalgad Fort | Dainik Gomantak

तलाव आणि पाण्याची सोय

किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय आहे. माथ्यावर खडकात खोदलेली अनेक पाण्याची टाकी आणि मोठे तलाव पाहायला मिळतात, जे उन्हाळ्यातही भरलेले असतात.

Ghosalgad Fort | Dainik Gomantak

मुख्य आकर्षण

किल्ल्यावर प्रवेश करताना उत्तरेकडील आणि दक्षिणेकडील दोन माच्या महत्त्वाच्या आहेत. तसेच, 'पिरपागा' बुरुज आणि प्रवेशद्वाराची रचना आजही पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

Ghosalgad Fort | Dainik Gomantak

जंजिऱ्याशी संबंध

जंजिऱ्याचा सिद्दी आणि मराठे यांच्यातील संघर्षात या किल्ल्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती. हा किल्ला अनेकदा सिद्दी आणि मराठे यांच्यात हस्तांतरित झाला होता.

Ghosalgad Fort | Dainik Gomantak

पर्यटकांसाठी सोपे गिर्यारोहण

घोसाळगड हा चढण्यासाठी मध्यम स्वरुपाचा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी घोसाळे गाव असून तिथून पाऊण ते एक तासात किल्ल्याच्या माथ्यावर सहज पोहोचता येते. माथ्यावरुन कुंडलिका नदीचे पात्र आणि आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर दिसतो.

Ghosalgad Fort | Dainik Gomantak

Best Summer Fruits: उन्हाळ्यात खा 'हे' दोन सुपरफ्रूट्स! कडक उन्हातही वाटेल थंडा थंडा कूल कूल

Dainik Gomantak
आणखी बघा