कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणऱ्यांसाठी 2025 वर्ष खास; पगारात होणार भरघोस वाढ

Manish Jadhav

2025 वर्ष

2025 हे वर्ष कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी लाभदायी ठरणार आहे. यावर्षी त्यांच्या पगारात सुमारे 6 ते 15 टक्के वाढ अपेक्षित आहे.

corporate employee | dainik gomantak

कौशल्ये

अहवालात म्हटले की, वाढत्या कौशल्यांमुळे आणि महत्त्वाच्या नेतृत्व क्षमतांमध्ये वाढ झाल्यामुळे, यावर्षी लोकांचे पगार, विशेषतः उच्च कुशल आणि नेतृत्व पातळीवरील लोकांचे पगार वाढू शकतात. बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील जलद डिजिटल परिवर्तनामुळे कुशल लोकांची मागणी वाढत आहे.

corporate employee | dainik gomantak

भारतात काय स्थिती

भारतात रोजगारात लवचिकता दिसून आली आहे, असा दावा अहवालात करण्यात आला आहे. 2024 च्या सुरुवातीच्या तुलनेत यामध्ये वाढ झाली आहे. भारतात, वार्षिक पगारवाढ 6-15 टक्के असते तर पदोन्नतीसाठीची वाढ 20-30 टक्के असते.तसेच, चांगले कौशल्य असलेल्या आणि व्यवस्थापकीय पदांवर असलेल्यांना 30 ते 40 टक्क्यांपर्यंत पगारवाढ मिळते.

corporate employee | dainik gomantak

नोकरीच्या संधी वाढणार

मायकेल पेजच्या अहवालानुसार, बँकिंग, तंत्रज्ञान आणि उत्पादन क्षेत्रांसारख्या वित्तीय क्षेत्रातील कंपन्या नवीन भरती करत असून चांगले पगार देखील देत आहेत.

corporate employee | dainik gomantak

फायदा कोणाला मिळतोय?

यासोबतच, कंपन्या कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन (ESOPs) आणि दीर्घकालीन प्रोत्साहने वाढवण्यासाठी देखील काम करत आहेत. या सगळ्याचा फायदा प्रामुख्याने वरिष्ठ पातळीवरील लोकांना होत आहे, कारण ते बाजारात उपलब्ध असलेल्या उच्च प्रतिभांसह भरतीसाठी सहजपणे स्पर्धा करत आहेत.

corporate employee | dainik gomantak

या क्षेत्रात नोकरनिर्मिती

आजकाल, वाढत्या तंत्रज्ञानामुळे या क्षेत्रात एआय पासून डेटा सुरक्षा पातळीपर्यंतच्या नोकऱ्यांची मागणी वाढत आहे. यासोबतच, उत्पादन उद्योगात ईव्ही बनवण्यासाठी सेमीकंडक्टर आणि हरित उर्जेशी संबंधित कामांसाठी लोकांना कामावर ठेवले जात आहे.

corporate employee | dainik gomantak

पगारात 40 टक्के वाढ होणार

जागतिक भरती सल्लागार कंपनी मायकेल पेजच्या 2025 च्या वेतन मार्गदर्शक अहवालानुसार, यावर्षी भारतातील कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या पगारात 40 टक्क्यांनी वाढ होईल.

आणखी बघा