Akshata Chhatre
कमी खर्चात त्वचेला चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी स्वयंपाकघरातील हळद या पिवळ्या पावडरपासून बनवलेला एक सोपा आणि प्रभावी फेस पॅक सांगितला आहे.
ब्युटी पार्लरमधील महागडे फेशियल किंवा उत्पादने न वापरता, तुम्ही घरातल्या फक्त तीन वस्तू वापरून त्वचेला नैसर्गिक चमक आणि पोषण देऊ शकता.
हा फेस पॅक त्वचा हायड्रेटेड ठेवतो आणि चमकदार बनवतो. यासाठी फक्त तीन गोष्टी लागतात; मलाई, हळद, गुलाबजल.
एका वाटीत हळद आणि मलाई घेऊन चमच्याच्या मदतीने चांगले मिसळा, जोपर्यंत एक घट्ट आणि क्रीमी पेस्ट तयार होत नाही. आता या मिश्रणात गुलाबजलाचे ५ थेंब घाला.
हा फेस पॅक रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर लावणे अधिक फायदेशीर ठरते. चेहरा मेकअप आणि घाणीपासून स्वच्छ करून, कोरड्या चेहऱ्यावर हा पॅक लावा. ४० मिनिटांपर्यंत पॅक चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.
या पॅकमुळे त्वचा खूप मुलायम, चमकदार आणि हायड्रेटेड राहते. विशेषतः हिवाळ्यासाठी हा बेस्ट पॅक आहे. चांगल्या परिणामांसाठी हा पॅक आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरा. चेहऱ्यासोबत मानेवरही लावा.
जर तुम्हाला हळद किंवा मलाईची ॲलर्जी असेल किंवा तुमची त्वचा खूप संवेदनशील असेल, तर हा पॅक लावणे टाळा.