Glowing Skin: 7 दिवसांत मिळवा 'ग्लास स्किन'! केमिकल्सला करा 'बाय-बाय', 'या' नैसर्गिक पदार्थांनी चेहरा उजळवा

Sameer Amunekar

बेसन, हळदीचा उटण्यासारखा वापर

पिढ्यानपिढ्या चालत आलेला हा उपाय सर्वात प्रभावी आहे. २ चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि थोडे दही एकत्र करून चेहऱ्याला लावा. यामुळे त्वचेवरील मृत पेशी निघून जातात आणि चेहरा उजळतो.

Glowing Skin | Dainik Gomantak

कोरफड जेल

रात्री झोपण्यापूर्वी ताज्या कोरफडीचे जेल चेहऱ्याला लावा. कोरफड त्वचेला हायड्रेट ठेवते आणि मुरुमांचे डाग कमी करून चेहरा मऊ आणि चमकदार बनवते.

Glowing Skin | Dainik Gomantak

मध, लिंबाचा रस

मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे, तर लिंबू 'नॅचरल ब्लीच'चे काम करते. १ चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस एकत्र करून १० मिनिटे चेहऱ्यावर ठेवा. यामुळे इन्स्टंट ग्लो मिळतो.

Glowing Skin | Dainik Gomantak

कच्च्या दुधाने क्लीन्सिंग

कापसाचा बोळा कच्च्या दुधात भिजवून त्याने चेहरा पुसून घ्या. दूध त्वचेला आतून स्वच्छ करते आणि लॅक्टिक ॲसिडमुळे त्वचा अधिक तरुण आणि तजेलदार दिसते.

Glowing Skin | Dainik Gomantak

पपईचा पल्प

पपईमध्ये 'पपेन' नावाचे एन्झाइम असते, जे त्वचेचा रंग सुधारण्यास मदत करते. पिकलेल्या पपईचा गर चेहऱ्यावर चोळल्याने टॅनिंग कमी होते आणि चेहरा सेलिब्रिटींसारखा चमकू लागतो.

Glowing Skin | Dainik Gomantak

गुलाब पाण्याचा स्प्रे

दिवसभरात कधीही चेहऱ्यावर गुलाब पाण्याचा स्प्रे करा. हे नैसर्गिक टोनर म्हणून काम करते आणि त्वचेचा पोत सुधारून चेहऱ्यावर गुलाबी टवटवी आणते.

Glowing Skin | Dainik Gomantak

टोमॅटोचा रस

मोठ्या छिद्रांची समस्या असल्यास टोमॅटोचा रस अत्यंत गुणकारी आहे. टोमॅटोचा तुकडा चेहऱ्यावर चोळल्याने तेलकटपणा कमी होतो आणि त्वचेला एक वेगळीच चकाकी मिळते.

Glowing Skin | Dainik Gomantak

कोकणातील 'मिनी मालदीव' म्हणून ओळखला जाणारा 'हा' बीच पाहिला का?

Konkan Hidden Beach | Dainik Gomantak
येथे क्लिक करा