Akshata Chhatre
एका ग्लास पाण्यात २ लवंगा रात्रभर भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर त्यात लिंबाचा रस आणि थोडे मध मिसळा.
हे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी प्या. सतत २१ दिवस हा नियम पाळल्यास त्वचा आतून स्वच्छ होते.
लवंगात अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे रक्तातील अशुद्धी काढून मुरुम येणे थांबवतात.
लिंबामध्ये व्हिटॅमिन-सी भरपूर असते, जे कोलाजन वाढवते आणि त्वचेवरील काळे डाग फिके करण्यास मदत करते.
मध शरीराला डिटॉक्स करण्यासोबतच त्वचेतील नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवते, ज्यामुळे चेहरा कोरडा पडत नाही.
२१ दिवस नियमित सेवन केल्यानंतर, २२ व्या दिवशी तुम्हाला तुमची त्वचा अधिक नितळ आणि चमकदार दिसेल.
हे पूर्णपणे नैसर्गिक पेय असल्याने याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि पार्लरचा हजारो रुपयांचा खर्चही वाचतो.