Healthy Tulsi Leaves :मोठी आणि टवटवीत पाने हवीत? मग तुळशीला घाला कापूराचे खत, लगेच फरक पडेल

Sameer Amunekar

कापूरातील औषधी गुणधर्म

कापूर हा नैसर्गिक कीटकनाशक असून त्यात अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे तुळशीच्या मुळांभोवती जिवाणूंची वाढ थांबते आणि झाड निरोगी राहते.

Tulsi Care Tips | Dainik Gomantak

मातीतील पोषण सुधारते

कापूर जमिनीत मिसळल्यास मातीचा पोत सुधारतो. त्यामुळे मुळे अधिक पोषणशक्ती घेतात आणि पाने मोठी, दाट व टवटवीत होतात.

Tulsi Care Tips | Dainik Gomantak

किटकांपासून संरक्षण

तुळशीच्या झाडाला लागणाऱ्या पांढरी माशी, फुलकिडी व इतर कीटकांपासून कापूर झाडाचे नैसर्गिक रक्षण करतो.

Tulsi Care Tips | Dainik Gomantak

कसे वापरावे?

दर १५ दिवसांनी अर्धा चमचा कापूर पावडर थोड्याशा पाण्यात विरघळवून झाडाच्या मुळाशी टाकावे. थेट पानांवर न टाकता जमिनीतच घालणे फायदेशीर.

Tulsi Care Tips | Dainik Gomantak

इतर खतांबरोबर उपयोग

कापूराचा वापर शेणखत, कंपोस्ट किंवा घरच्या सेंद्रिय खतांसोबत केल्यास त्याचा प्रभाव अधिक चांगला दिसून येतो.

Tulsi Care Tips | Dainik Gomantak

जास्त वापर टाळा

कापूर जरी नैसर्गिक असला महिन्यातून २ वेळा इतकाच वापर करावा. तरच तुळशीच्या झाडाला फायदा होईल.

Tulsi Care Tips | Dainik Gomantak

सतत डोकं दुखत असेल तर वेळीच सावध व्हा

Health Tips For Headache | Dainik Gomantak
येथे क्लिक करा