Ashutosh Masgaunde
2007 मध्ये वनडे सामन्यादरम्यान कानपूरमध्ये गंभीर फलंदाजी करत होता आणि आफ्रिदी गोलंदाजी करत होता. आफ्रिदीच्या चेंडूवर गंभीरने जबरदस्त चौकार मारला आणि यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ झाली.
2010 मध्ये वनडे सामन्यादरम्यान गंभीर पुन्हा एकदा मैदानावर संतापला. गंभीरला बाद करण्याबाबत पाकिस्तानकडून अपील करण्यात आले होते, त्यावर गंभीरचा कामरान अकमलसोबत वाद झाला.
भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक विराट कोहलीसोबतही गंभीरचे खास नाते आहे. दोघेही आयपीएलमध्ये दोनदा आमनेसामने आले आहेत.
२०१३ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार असताना गंभीर आणि कोहली एकमेकांविरुद्ध उभे होते. यानंतर, 2023 मध्ये, जेव्हा गंभीर लखनऊ सुपरजायंट्सचा मेंटॉर होता, तेव्हा दोघेही सामन्यानंतर एकमेकांच्या विरोधात उभे राहिले.
लेजेंड्स लीग क्रिकेट 2023 मधील इंडिया कॅपिटल्स विरुद्ध गुजरात जायंट्स यांच्यातील सामन्यात गौतम गंभीर आणि श्रीसंत यांच्यातील वाद आता मैदानाबाहेरही रंगत आहे.
आशिया चषक 2023 च्या संघर्षादरम्यान गंभीरचा चाहत्यांशीही संघर्ष झाला होता. सामन्याच्या प्रसारणावेळी गंभीरसमोर चाहत्यांनी धोनी आणि कोहलीच्या नावाचा जयघोष केला. तेव्हा त्याने चाहत्यांना मधले बोट दाखवले.
निवृत्तीनंतर भाजपच्या तिकिटावर खासदार झालेला गंभीर आपल्या राजकीय विरोधकांबरोबरही सतत वाद घालत असतो.