Sameer Panditrao
अज्ञानी व्यक्ती एखाद्या बैलाप्रमाणे असतो. तो ज्ञानाने नाही फक्त आकाराने वाढतो.
या जगात आनंद आणि दुःख स्थायी (सतत) असू शकत नाही. तुम्ही अंधारात असाल तर तुम्हाला प्रकाशाचा शोध घेणे आवश्यक आहे.
निघून गेलेल्या काळावर ध्यान केंद्रित करू नये, भविष्यासाठी स्वप्न पाहू नये; बुद्धीचा वापर वर्तमानामध्ये केंद्रित करावा.
प्रत्येक व्यक्ती आपले आरोग्य आणि आजार याबाबत निर्णय घेऊ शकतो. यामुळे आहार आणि दिनचर्या याकडे विशेष लक्ष द्यावे.
मनच सर्वकाही आहे, तुमची जसा विचार करता तसेच बनता.
तुम्ही तीच गोष्ट गमावता ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता.
जीभ ही एखाद्या धारदार सुरीप्रमाणे असते. त्यातून आलेले शब्द घायाळ करतात, रक्ताचा सडा घालत नाहीत इतकाच फरक आहे.