गोमन्तक डिजिटल टीम
गोवा जसा नैसर्गिक सौन्दर्य आणि पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे तसाच इथला इतिहासही रंजक आहे.
विजापूरचा मुस्लिम शासक युसूफ आदिल शाहने गोव्यात उन्हाळी वास्तव्यासाठी एक राजवाडा उभा केला होता.
विजापूर राज्याचा सुलतान युसूफ आदिल शाहच्या राजवाड्याचे प्रवेशद्वाराचे हे अवशेष आपल्याला भूतकाळात घेऊन जातात.
१५१० मध्ये पोर्तुगीज वसाहतवादी सैन्याने आदिल शाहच्या सैन्याचा पराभव केला आणि या जमिनीवर ताबा मिळवला.
१६९५ पर्यंत पोर्तुगीज गव्हर्नरांनी निवासस्थान म्हणून या राजवाड्याचा वापर केला.
१७ व्या शतकातील महामारी दरम्यान ते सोडण्यात आले आणि १८२० मध्ये पोर्तुगीज सरकारच्या आदेशानुसार ते पाडण्यात आले.
हे कलात्मक प्रवेशद्वार मात्र असेच उभे आहे. प्रवेशद्वारापाशी काही पायऱ्या अजूनही अस्तित्वात आहेत.
हे ठिकाण पणजीहून १० किमी तर मडगावहून ३२ किमी अंतरावर आहे. तुम्ही येथे खासगी गाडी अथवा सार्वजनिक वाहतूक सेवेने सहज जाऊ शकता.