Sameer Amunekar
इनडोअर प्लांट्सची काळजी घेताना पाणी, प्रकाश आणि माती याकडे दुर्लक्ष झालं तर झाडांची वाढ खुंटू शकते. काही छोट्या चुका टाळल्यास झाडं अधिक निरोगी ठेवता येतात.
झाडाला रोज पाणी देणं गरजेचं नसतं. मातीचा वरचा थर कोरडा झाला आहे का ते तपासा, त्यानंतरच पाणी द्या. जास्त पाण्यामुळे मुळं कुजण्याचा धोका असतो.
कुंडीच्या तळाशी पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्रं असतील याची खात्री करा. पाणी साचून राहिल्यास मुळांना हवा मिळत नाही आणि झाड कमजोर होऊ शकतं.
इनडोअर प्लांट्सना देखील प्रकाशाची गरज असते. झाडाच्या प्रकारानुसार खिडकीजवळ अप्रत्यक्ष सूर्यप्रकाश मिळेल अशा ठिकाणी कुंडी ठेवा.
पिवळी किंवा पूर्णपणे सुकलेली पानं आणि खराब झालेल्या फांद्या वेळोवेळी काढा. यामुळे झाडाची ऊर्जा निरोगी भागांच्या वाढीसाठी वापरली जाऊ शकते.
कुंडीतील माती खूप घट्ट झाली असेल तर पाणी आणि हवा मुळांपर्यंत व्यवस्थित पोहोचत नाही. त्यामुळे हवादार आणि पाण्याचा निचरा होणारी माती वापरणं फायदेशीर ठरतं.
पाणी गरजेपुरतंच द्या + योग्य प्रकाश द्या, या दोन गोष्टी इनडोअर प्लांट्ससाठी सर्वात महत्त्वाच्या आहेत. योग्य काळजी घेतली तर तुमची घरातील हिरवळ अधिक सुंदर आणि तजेलदार दिसू शकते.