गोमंतक ऑनलाईन टीम
दररोज पाणी देण्याऐवजी आधी मातीचा वरचा थर तपासा. माती कोरडी वाटत असेल तरच योग्य प्रमाणात पाणी द्या.
कुंडीच्या तळाशी Drainage Holes असणं गरजेचं आहे. अतिरिक्त पाणी बाहेर निघालं नाही तर मुळं कुजण्याची शक्यता असते.
प्रत्येक झाडाला सूर्यप्रकाशाची गरज वेगवेगळी असते. रोपाच्या प्रकारानुसार त्याला योग्य प्रकाश मिळेल अशा ठिकाणी ठेवा.
माती खूप घट्ट झाली असेल तर ती हलकी करा. यामुळे मुळांना हवा मिळण्यास आणि पाण्याचा निचरा होण्यास मदत होते.
पिवळी, सुकलेली किंवा खराब झालेली पानं आणि फांद्या नियमितपणे काढल्याने झाडाची निगा राखता येते.
झाडाच्या गरजेनुसार योग्य खत वापरा. जास्त खत दिल्यास झाडाच्या मुळांना नुकसान होऊ शकते.
पानांवर डाग, छिद्र, चिकटपणा किंवा कीड दिसत असल्यास लवकर उपाय करा. नियमित निरीक्षणामुळे झाडाची समस्या वेळेत ओळखता येते.
बाप्पाच्या पूजेत चुकूनही करू नयेत 'या' 7 चुका