Gardening Tips: रोपांची वाढ का खुंटते? 'या' चुका टाळा आणि झाडांना द्या नवी संजीवनी

गोमंतक ऑनलाईन टीम

गरजेपेक्षा जास्त पाणी देणे

दररोज भरपूर पाणी दिल्याने मुळांना हवा मिळत नाही आणि कुजण्याचा धोका वाढतो. मातीचा वरचा थर तपासूनच पाणी द्या.

Gardening Tips | Dainik Gomantak

योग्य सूर्यप्रकाश न मिळणे

प्रत्येक रोपाला आवश्यक तेवढा प्रकाश मिळणे गरजेचे आहे. कमी प्रकाशामुळे पानांची वाढ आणि नवीन फुटवे कमी होऊ शकतात.

Gardening Tips | Dainik Gomantak

कुंडीमध्ये पाण्याचा निचरा नसणे

कुंडीच्या तळाला ड्रेनेज होल नसतील तर अतिरिक्त पाणी साचते. त्यामुळे मुळांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

Gardening Tips | Dainik Gomantak

मातीचा पोत योग्य नसणे

खूप घट्ट किंवा पाणी धरून ठेवणारी माती मुळांच्या वाढीस अडथळा ठरू शकते. भुसभुशीत आणि चांगला निचरा होणारी माती वापरा.

Gardening Tips | Dainik Gomantak

खताचा अतिरेक करणे

रोप लवकर वाढावे म्हणून जास्त खत देणे उलट नुकसानकारक ठरू शकते. रोपाच्या गरजेनुसार आणि योग्य प्रमाणातच खत द्या.

Gardening Tips | Dainik Gomantak

कुंडीचा आकार चुकीचा असणे

रोपाच्या मुळांना वाढण्यासाठी पुरेशी जागा नसेल तर त्याची वाढ खुंटू शकते. मुळे खूप पसरली असतील तर योग्य आकाराच्या कुंडीत रोप लावा.

Gardening Tips | Dainik Gomantak

सुकलेली पाने आणि फांद्या न काढणे

सुकलेली किंवा खराब झालेली पाने-फांद्या वेळोवेळी काढल्यास रोपाची ऊर्जा नवीन वाढीकडे वळण्यास मदत होते.

Gardening Tips | Dainik Gomantak

नेहमी टवटवीत आणि ग्लोइंग स्किनचं गुपित काय? वाचा कोरियन स्किनकेअरचे सोपे मंत्र!

येथे क्लिक करा