Gardening Tips: कुंडीतली झाडे सुकतायत? फक्त या ७ गोष्टी लक्षात ठेवा, बाग फुलेल छान!

गोमंतक ऑनलाईन टीम

झाडांना योग्य प्रमाणात पाणी द्या

माती कोरडी झाल्यावरच पाणी द्या. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास मुळे कुजण्याची शक्यता असते.

Gardening Tips | Dainik Gomantak

सूर्यप्रकाशाची योग्य व्यवस्था करा

काही झाडांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो, तर काही झाडे सावलीत चांगली वाढतात. झाडाच्या गरजेनुसार जागा निवडा.

Gardening Tips | Dainik Gomantak

कुंडीतील माती भुसभुशीत ठेवा

माती घट्ट झाल्यास मुळांपर्यंत हवा पोहोचत नाही. मातीमध्ये कोकोपीट, कंपोस्ट किंवा योग्य सेंद्रिय घटक मिसळा.

Gardening Tips | Dainik Gomantak

महिन्यातून एकदा सेंद्रिय खत द्या

झाडांच्या वाढीसाठी गांडूळ खत किंवा चांगले कुजलेले कंपोस्ट वापरा. खताचे प्रमाण झाडाच्या गरजेनुसार ठेवा.

Gardening Tips | Dainik Gomantak

कुंडीला ड्रेनेज होल असू द्या

कुंडीच्या तळाशी पाणी बाहेर जाण्यासाठी छिद्र असणे आवश्यक आहे. त्यामुळे पाणी साचून मुळे कुजण्याचा धोका कमी होतो.

Gardening Tips | Dainik Gomantak

सुकलेली पाने आणि फांद्या काढा

पिवळी, सुकलेली किंवा रोगट पाने नियमित काढून टाका. पानांच्या खालच्या बाजूला कीड आहे का, हेही तपासा.

Gardening Tips | Dainik Gomantak

झाडांची जागा वारंवार बदलू नका

झाडांना नवीन वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी वेळ लागतो. योग्य प्रकाश आणि हवा मिळणारी जागा निवडून शक्यतो तिथेच ठेवा.

Gardening Tips | Dainik Gomantak

उन्हामुळे त्वचा खराब होऊ नये म्हणून घ्या अशी काळजी!

येथे क्लिक करा