Gardening Tips: घरातली रोपं सारखी सुकतायत? 'या' 7 स्मार्ट टिप्सने झाडांना मिळेल नवा बहर

गोमंतक ऑनलाईन टीम

पाणी देण्याची योग्य वेळ ओळखा
माती वरून कोरडी वाटली तरच पाणी द्या. गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास मुळं खराब होऊ शकतात.

Gardening Tips | Dainik Gomantak

कुंडीत Drainage होणं गरजेचं!
कुंडीच्या तळाशी पाण्याचा निचरा होण्यासाठी छिद्रं आहेत याची खात्री करा. साचलेलं पाणी रोपांसाठी नुकसानकारक ठरू शकतं.

Gardening Tips | Dainik Gomantak

रोपाला मिळू द्या योग्य सूर्यप्रकाश
प्रत्येक रोपाची प्रकाशाची गरज वेगळी असते. त्यामुळे रोपाच्या गरजेनुसार ते योग्य ठिकाणी ठेवा.

Gardening Tips | Dainik Gomantak

मातीचा पोत तपासा
माती खूप घट्ट झाली असेल तर ती हलकी आणि भुसभुशीत करा. योग्य मातीमुळे मुळांना हवा मिळण्यास मदत होते.

Gardening Tips | Dainik Gomantak

सुकलेली पानं आणि फांद्या काढा
पिवळी किंवा पूर्णपणे सुकलेली पानं नियमितपणे काढल्याने रोपाची निगा राखणे सोपं होतं.

Gardening Tips | Dainik Gomantak

खत देताना घाई करू नका
रोपाच्या प्रकारानुसार योग्य खत आणि योग्य प्रमाण वापरा. जास्त खत दिल्याने रोपाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकतं.

Gardening Tips | Dainik Gomantak

कीड आणि रोगांवर ठेवा लक्ष
पानांवर डाग, चिकटपणा, जाळीसारखे चिन्ह किंवा कीड दिसत असल्यास लवकर उपाय करा. नियमित निरीक्षण केल्याने समस्या वाढण्यापूर्वी लक्षात येते.

Gardening Tips | Dainik Gomantak

चेहऱ्यावर डलनेस दिसतोय? 'या' 7 टिप्सने त्वचेला मिळवा ग्लोइंग लुक

येथे क्लिक करा