Sameer Panditrao
पुण्यात गणेशोत्सव फार सुंदर साजरा होतो. विविध भागातून भक्त इथे दर्शनाला, मिरवणूका पाहायला येतात.
मुंबईत गणेशोत्सवाचे चैतन्य वेगळेच असते. लालबागच्या राजाला फार गर्दी होते.
कोकणात गणेशोत्सव सगळ्यात खास असतो. कोकणी माणूस जगाच्या कोपऱ्यावरून गावी दाखल होतो.
गोव्यात गणेशपूजनाची मोठी परंपरा आहे. इथली माटोळी तसेच भजनाची परंपरा जुनी आहे.
अहमदाबादमध्ये गणपती मोठ्या उत्साहात साजरा होतो. गुजराती बांधव यात समरसून सहभाग घेतात.
हैद्राबादमध्ये गणेशोत्सव बघण्यासारखा असतो. इथे वैशिष्टयपूर्ण गणेशमूर्ती पाहायला मिळतात.
नागपूरमध्येही गणपती उत्सव खास असतो. इथे मिरवणुका पाहायला गर्दी होते.