Akshata Chhatre
गणेशोत्सव म्हटलं की घराघरात वेगवेगळ्या पक्वान्नांचा सुगंध दरवळतो. गोव्यातील चतुर्थीच्या जेवणाची खासियत म्हणजे विविध गोडधोड पदार्थ, परंपरागत भाज्या आणि खास प्रसंगानुसार बनवले जाणारे जेवण.
गणेशाला अर्पण करण्यासाठी मोदक, नेवरीसारख्या मिठायांबरोबरच "पातोळी" नावाचा निराळा पदार्थही केला जातो.
यात कोणतंही सारण किंवा मीठ नसतं, आणि ही पातोळी गौरी पूजनाच्या दिवशी खास बनवली जाते.
पाच वेगवेगळ्या आकारात बनवलेल्या गव्हाच्या कणकेच्या, हरभऱ्याच्या डाळीच्या आणि गुळाच्या सारणाच्या तळलेल्या पदार्थांची खास परंपरा आहे.
गणेश चतुर्थीच्या दिवशी "खातखतें" नावाचा पारंपरिक पदार्थ जेवणात असतो. नारळाच्या ग्रेव्हीत बनवलेल्या या मिश्र भाजीत स्थानिक भाज्या, कंदमुळे आणि वैशिष्ट्यपूर्ण "तेफळ" मसाल्याची चव असते.
हरतालिका पूजेच्या दिवशी पाच प्रकारच्या पालेभाज्यांची भाजी आवर्जून केली जाते. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या या भाज्या पोषक, तंतुमय आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेल्या असतात.
गोव्याची चतुर्थी ही गोडधोड, खमंग आणि पारंपरिक पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. विशेषतः मोदक हा गणपती बाप्पाचा लाडका पदार्थ असल्यामुळे, वेगवेगळ्या प्रकारचे मोदक अर्पण करून भक्त गणरायाची मनोभावे पूजा करतात.