गोमन्तक डिजिटल टीम
आपल्या शेतीप्रधान भारतभूमीत धान्य घरात आल्यावर गोडधोड, सण-उत्सव प्रारंभ होतात.
पाऊस कमी आला की गोव्यात सगळे गणपतीबाप्पाच्या आगमनाची वाट पाहत असतात. नवीन कपडे, फराळ, आरती, भजनांची रेलचेल असते.
गोव्यातील गणेशचतुर्थीचे निसर्गाशी अतूट नाते आहे. य़ाबद्द्ल आपण आज माहिती घेऊ.
माटोळी हे खास गोव्याच्या गणेशचतुर्थीचे वैशिष्ट्य आहे. वेगवेगळ्या प्रकारची फळे, खास करून हंगामी रानफळे, गणपतीसमोरच्या लाकडी चौकटीत बांधली जातात
गौरीला विविध प्रकारच्या भाज्या शिजवल्या जातात. त्यामुळे गणेशचतुर्थीचे दिवस जवळ आले की भाजीबाजारही खुलतो
गणपतीला लाल फुले, दूर्वा प्रिय असतात. फुले, पत्री, दूर्वा ही साधनसामुग्री ताजी आणली जाते.
निसर्गाशी निगडित असलेले सण आपल्याला खूप काही शिकवून जातात. या सणांमुळे वेगवेगळ्या वनस्पतींशी, झाडांशी आपला नजीकचा संबंध येतो.