गोमन्तक डिजिटल टीम
गोमंतकीयांचा आवडता सण गणेशोत्सव अगदी जवळच येऊन ठेपलेला आहे.
जशीजशी चतुर्थी जवळ आली आहे तशी चित्रशाळांत मूर्तींवर शेवटचा हात फिरवण्यासाठी लगबग पाहायला मिळते आहे.
चतुर्थीवेळी घुमटवाद्य, समेळ, टाळ, झांज, पेटी, तबला आदी वाद्यांची देखील विक्री होते.
‘चवथीचो बाजार’ना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जिथे एकाच छताखाली अनेक वस्तू विकत घेता येत आहेत.
रंगीबेरंगी पुष्पहारांनी दुकाने सजलेली आहेत, फुलांचीही मोठ्या प्रमाणावर विक्री होते.
माटोळीसाठी लागणारी फळे, पाने, वेली घेण्यासाठी भाविक गडबड करत आहेत.
बाजारात ग्राहकांची भरगच्च गर्दी आहे. श्री गणरायाच्या सेवेबरोबरच अनेकांना रोजगार देणारा हा सण आहे.