गोमन्तक डिजिटल टीम
भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या दिवशी गोव्यात विविध ठिकाणी गणेशपूजा संपन्न होत आहे.
गणेश चतुर्थी म्हणजे गोवेकरांसाठी उत्साह आणि आनंदाचे वातावरण होय.
लाडक्या गणपतीला साजेल अशा मखरात गणपतीला विराजमान करून स्थानिक मनोभावे पूजा करतात.
दुपारी गणपतीला उकडीच्या मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो.
आजपासून दीड, पाच, सात, नऊ, अकरा आणि एकवीस दिवस गणपतीची आराधना केली जाते.
संध्याकाळी घुमटाच्या तालात विविध आरत्या गायल्या जातात.
गणपतीची पूजा संपन्न झाल्यांनतर आजूबाजूला भेट देत गणपती बाप्पाचे दर्शन घेतले जाते.