गोमन्तक डिजिटल टीम
लोकप्रिय सण
गोव्यातला सगळ्यात खास सण 'चवथ', म्हणजेच गणेशचतुर्थी जी आता पंधरा दिवसान ठेपली आहे.
पोर्तुगीजपूर्व काळापासून
पोर्तुगीजपूर्व काळापासून हा गणेश उत्सव सण गोव्यात धुमधडाक्यात साजरा केला जात असेल
गणेश मंदिरांचा भातशेतीशी संबंध
गोव्यात ज्या ठिकाणी भात पिक घेतले जास्त प्रमाणात घेतले जात होते. तेथे पोर्तुगीजपूर्व काळात प्रामुख्याने गणेश मंदिरे होती हे राज्याच्या ऐतिहासिक दस्तऐवजांत आढळत आहेत.
गणेश मंदिरांचे स्थलांतर
पोर्तुगीजांच्या धार्मिक छळामुळे गोव्यातील दिवाडी बेटावरच्या गणेश मंदिराचे खांडेपार आणि नंतर खांडोळा येथे स्थलांतर केले.
शतकोत्तर वर्षाचा इतिहास
उत्तर गोव्यातील खांडोळा येथे असलेले हे श्री महागणपतीचे मंदिर गणेश पूजनाचा खूप पूर्वी पासूनचा इतिहास आहे हे समजते .
गणेश मंदिरं आणि तांदूळ उत्पादन
करमळी, चोडण, एला, ओलावली, पोंबुरपा, सांगोल्डा, बेतालभाटी, शिवोली, दिवडी या गावांमध्ये तांदूळ प्रजननाशी संबंधित प्राचीन गणेश मंदिरं आहेत.
गोव्यातील उपेक्षित मूर्ती
डिचोली तालुक्यातील कौंडिण्यपूर उपेक्षित असलेली द्विहस्त गणेश मूर्ती शेकडो वर्षांच्या इतिहासाची साक्ष आहे.
रेडी गावातील महाकाय मूर्ती
तेरेखोल नदीपल्याड, बदामी चालुक्यांच्या रेवतीद्विप येथे आढळलेली महाकाय द्विहस्त गणेश मूर्ती ६व्या-७व्या शतकातील गणेश पूजनाच्या इतिहासाची आठवण करून देते.
सांगे आणि पिलार सेमिनारीतील मूर्त्या
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या वस्तुसंग्रहालयात आणि पिलार सेमिनारीच्या वस्तू संग्रहालयातील गणेश मूर्त्या, प्राचीन गणेश पूजनाची परंपरा दर्शवतात.
विविध ठिकाणच्या गणेश मूर्त्या
सांग्यातील विचुंद्रे, पेडण्यातील कोरगाव, केप्यातील चंद्रेश्वर, फोंड्यातील शिरोडा येथे आढळलेल्या चतुर्हस्त गणेश मूर्त्या आणि काणकोणातील द्विहस्त गणेश मूर्ती, गोवा कदंब राजवटीतील कृषक समाजाला पूजनीय ठरल्या होत्या.
कृषी संस्कृतीशी गणेश पूजनाचे नाते
पूर्वजांनी गणेश पूजनाची उपासना कृषी संस्कृतीशी संबंधित हेतूने केली होती, पण आज ती परंपरा हळूहळू लुप्त होत आहे.
प्राचीन मूर्ती आणि लोकनाट्य
शेकडो वर्षांपासून गोव्यात गणेश पूजन दगडी, मृण्मय, लाकडी मूर्ती आणि लोकनाट्यातील सजीव कलाकारांद्वारे केले जाते, जसे की रणमाले आणि दशावतारी नाटक.
गणेश मूर्त्यांचे संवर्धन
गोव्यातील प्राचीन गणेश मूर्त्यांचे योग्य संवर्धन आणि संरक्षण हे त्यांच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे.