राम चरणच्या Game Changer चं दमदार वर्ल्डवाइड कलेक्शन

Manish Jadhav

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने 2025 वर्षाची सुरुवात दणक्यात केली आहे. याचदरम्यान, प्रसिद्ध अभिनेता राम चरणचा 'गेम चेंजर' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

Ram Charan | Dainik Gomantak

गेम चेंजरचा जलवा

राम चरणचा 'गेम चेंजर' 2025 मध्ये मोठी कमाई करताना दिसत आहे. ट्रेड अॅनालिस्ट मनोबाला विजयबालन यांनी गेम चेंजरच्या जगभरातील कलेक्शनचे आकडे शेअर केले आहेत.

Ram Charan | Dainik Gomantak

कलेक्शन

आकडेवारीनुसार, हा चित्रपट आता वेगाने 300 कोटींकडे वाटचाल करत आहे. या चित्रपटाने पहिल्या दिवशी 186 कोटी रुपये कमावले. यानंतर, दुसऱ्या दिवशीही चित्रपटाने जगभरातील कलेक्शनच्या बाबतीत चांगली कामगिरी केली आणि 84 कोटी रुपये कमावले. या संदर्भात, चित्रपटाने दोन दिवसांत जगभरात 270 कोटी रुपये कमावले आहेत.

Ram Charan | Dainik Gomantak

देशात कलेक्शन किती?

भारतात या चित्रपटाचे कलेक्शन निराशाजनक दिसते. सुमारे 300 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट भारतात पहिल्याच आठवड्यात 100 कोटी रुपयेही कमाई करु शकला नाही.

Ram Charan | Dainik Gomantak

प्रतिक्रिया

चित्रपटाच्या या कलेक्शनवर अनेक लोक प्रतिक्रिया देत आहेत. जो चित्रपट देशात 100 कोटी रुपये कमवू शकत नाही, तो चित्रपट जगभरात 300 कोटी रुपये कसा कमवू शकतो हे अनेकांना पचत नाही, असं एकजण म्हणाला.

Ram Charan | Dainik Gomantak
आणखी बघा