Gagron Fort: तलवारींचा खणखणाट अन् सुलतानाचा दारुण पराभव! रक्तानं माखली गागरोनची माती; राणा संगांनं गाजवलं शौर्य

Manish Jadhav

गागरोन किल्ला

गागरोन किल्ला हा राजस्थानातील झालावाड जिल्ह्यात असून तो अहु आणि काली सिंध या दोन नद्यांनी वेढलेला आहे. तीनही बाजूंनी पाणी असलेला हा किल्ला एक अभेद्य 'जलदुर्ग' म्हणून ओळखला जातो, ज्यामुळे शत्रूला यावर आक्रमण करणे अत्यंत कठीण होते.

Gagron Fort | Dainik Gomantak

माळवाचा सुलतान विरुद्ध राणा संगाचा थरार

गागरोनची सर्वात प्रसिद्ध लढाई 1519 मध्ये मेवाडचे पराक्रमी शासक राणा संगा आणि माळवाचा सुलतान महमूद खिलजी (दुसरा) यांच्यात झाली. या लढाईत सुलतानाने किल्ल्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्याला राजपूत शौर्याचा सामना करावा लागला.

Gagron Fort | Dainik Gomantak

राणा संगाचा रणनीतिक विजय

या ऐतिहासिक युद्धात राणा संगा यांनी आपल्या अफाट युद्धकौशल्याच्या जोरावर सुलतान महमूद खिलजीचा दारुण पराभव केला. या विजयामुळे राजपुतांचे वर्चस्व संपूर्ण उत्तर भारतात अधिक मजबूत झाले.

Gagron Fort | Dainik Gomantak

सुलतानाला केले होते कैद

लढाईत पराभूत झाल्यानंतर सुलतान महमूद खिलजीला राणा संगा यांनी युद्धबंदी बनवले होते. मात्र, राजपुती औदार्य दाखवत राणा संगा यांनी काही महिन्यांनंतर त्याला सन्मानाने सोडून दिले आणि त्याचे राज्यही परत केले.

Gagron Fort | Dainik Gomantak

दोन भयानक 'जोहार'

गागरोन किल्ल्याचा इतिहास जितका शौर्याचा आहे, तितकाच तो बलिदानाचाही आहे. वेगवेगळ्या आक्रमणांच्या वेळी जेव्हा राजपुतांचा पराभव स्पष्ट दिसत होता, तेव्हा किल्ल्यातील हजारो राजपूत महिलांनी शत्रूच्या हाती न लागता अग्नीत उडी घेऊन 'जोहार' (आत्मबलिदान) केला होता.

Gagron Fort | Dainik Gomantak

अचलदास खिची यांचे सर्वोच्च बलिदान

1423 मध्ये जेव्हा मांडूच्या सुलतानाने (होशंग शाह) 12 हजार सैनिकांसह या किल्ल्यावर हल्ला केला, तेव्हा गागरोनचे शासक अचलदास खिची यांनी शरणागती न पत्करता शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला आणि ते धारातीर्थी पडले.

Gagron Fort | Dainik Gomantak

युनेस्को जागतिक वारसा स्थळ

आपल्या समृद्ध इतिहासामुळे आणि अद्भूत स्थापत्यकलेमुळे गागरोन किल्ल्याला युनेस्कोने (UNESCO) जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. आज हा किल्ला राजपुतांच्या पराक्रमाची आणि बलिदानाची साक्ष देत दिमाखात उभा आहे.

Gagron Fort | Dainik Gomantak

Torna Fort: निसरडे खडक अन् कातळातील पायऱ्या...! ढगांच्या दुलईत हरवणाऱ्या तोरणाची मान्सून सफर बनते यादगार; ट्रेकर्सचं नंदनवन

आणखी बघा