90% काम पूर्ण! भारताचे 'गगनयान' घालणार आकाशाला गवसणी

Sameer Panditrao

गगनयान

भारताची महत्त्वाकांक्षी गगनयान मोहीम हळूहळू प्रगती करत आहे आणि जवळपास ९० टक्के मोहिमेचे काम पूर्ण झाले आहे, असे इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनीसांगितले.

Gaganyaan Air Drop Test | Dainik Gomantak

मानवी अंतराळ मोहीम

‘गगनयान मोहीम ही भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे. गगनयान मोहीम खूप चांगल्या पद्धतीने सुरू आहे.

Gaganyaan Air Drop Test | Dainik Gomantak

ऑर्बिटल मॉड्यूल

रॉकेटला मानव-रेटेड करावे लागते. ऑर्बिटल मॉड्यूल विकसित करावे लागते आणि पर्यावरण नियंत्रण सुरक्षा प्रणाली विकसित करावी लागते.

Gaganyaan Air Drop Test | Dainik Gomantak

मानव-केंद्रित घटक

त्यानंतर क्रू एस्केप सिस्टम, पॅराशूट सिस्टम आणि अर्थातच, मानव-केंद्रित घटकाकडे लक्ष द्यावे लागते.

Gaganyaan Air Drop Test | Dainik Gomantak

श्रीहरिकोटा

२४ ऑगस्ट २०२५ रोजी इस्रोने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रात गगनयान कार्यक्रमासाठी पहिली एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी पूर्ण केली आहे.

Gaganyaan Air Drop Test | Dainik Gomantak

व्हॅलिडेशन

गगनयान मिशनसाठी क्रू मॉड्यूलच्या क्रिटिकल पॅराशूट-आधारित डिसिलरेशन सिस्टमच्या एंड-टू-एंड परफॉर्मन्स व्हॅलिडेशनचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या प्रदर्शित केले.

Gaganyaan Air Drop Test | Dainik Gomantak

एअर ड्रॉप चाचणी

गगनयान कार्यक्रमासाठी, एकात्मिक एअर ड्रॉप चाचणी कारण जेव्हा संपूर्ण मॉड्यूल अंतिम टप्प्यात परत येते, तेव्हा नऊ पॅराशूट योग्य स्प्लॅशडाउनसाठी समक्रमित पद्धतीने काम करतात.

Gaganyaan Air Drop Test | Dainik Gomantak

गोव्याला जाताय? मग महाराष्ट्र, कर्नाटकातील 'या' किनाऱ्यांनाही द्या भेट

Beach Tourism