Sameer Panditrao
गोव्याच्या सीमेजवळ महाराष्ट्र, कर्नाटकात असे अनेक सुंदर, शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारे आहेत, जे गर्दीपासून दूर आहेत. चला, जाणून घेऊ या त्या सात अप्रतिम बीचेसबद्दल.
स्फटिकासारखे निळे पाणी आणि स्कूबा डायव्हिंगसाठी प्रसिद्ध असलेला तारकर्ली बीच ‘महाराष्ट्राचा मालदीव’ म्हणून ओळखला जातो. जलक्रीडाप्रेमींसाठी हा स्वर्गच आहे.
बॅकवॉटर आणि समुद्राचा संगम असलेला हा बीच शांत, रमणीय आणि फोटोसाठी उत्तम आहे. सूर्यास्ताच्या वेळी येथेचे दृश्य अप्रतिम भासते.
माहिती: पर्यटनाच्या गर्दीपासून लांब, स्वच्छ व शांत वातावरण असलेला हा किनारा डॉल्फिन दर्शनासाठी प्रसिद्ध आहे. निसर्गप्रेमींसाठी परिपूर्ण ठिकाण.
माहिती: गोव्याच्या दक्षिणेला असलेला कारवार बीच शांतता आणि स्वच्छतेसाठी ओळखला जातो. येथे नेव्हल म्युझियम आणि वाटर स्पोर्ट्सची सुविधा आहे.
माहिती: धार्मिक आणि पर्यटनदृष्ट्या प्रसिद्ध गोकर्ण हे छोटेसे किनारी गाव आहे. ओम बीच, कुदळ बीच येथे ट्रेकिंग आणि ध्यानासाठी योग्य वातावरण आहे.
माहिती: विशाल शिवमूर्ती आणि सागरकाठी मंदिरामुळे प्रसिद्ध असलेला मुरुडेश्वर बीच हे श्रद्धा, सौंदर्य आणि साहस यांचं अद्वितीय मिश्रण आहे.