Akshata Chhatre
कोल्हापूर जिल्ह्यात वसलेला गगनबावडा घाट हा एक निसर्गरम्य आणि मनोहारी परिसर आहे, जो विशेषतः पावसाळ्यात अत्यंत सुंदर दिसतो.
येथे दरवर्षी अनेक पर्यटक येतात कोणी हिरवळीसाठी, कोणी दाट धुक्याच्या गाठीसाठी, तर कोणी थंड हवामान अनुभवण्यासाठी.
गगनबावड्याची खासियत म्हणजे येथून सुरू होणारे करुळ घाट आणि भुईबावडा घाट, हे दोन्ही घाट एकाच ठिकाणाहून वेगवेगळ्या दिशांना जातात.
पावसात या घाटांमधून प्रवास करताना दाट जंगल, निसर्गाचा शांत गारवा आणि अधूनमधून लागणारे धबधबे मन मोहित करून टाकतात.
पंत आमात्य वाडा, पाळसंबे लेणी, मोरजाई देवीचे मंदिर व पठार या सगळ्यामुळेच गगनबावडा हा चित्रपटांचे चित्रीकरणासाठीही एक लोकप्रिय ठिकाण बनले आहे.
जर तुम्हाला पावसाळ्यात निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवायचा असेल, तर गगनबावडा घाट हा उत्तम पर्याय आहे!